Sunday, 24 January 2016

सुस्वागतम

  
सप्रेम नमस्कार ,
             शिक्षक बंधु आणि भगिनीनो.
                           
                  junnareducation.blogspot.in
           हा ब्लॉग प्रसिद्ध करताना मला विशेष आनंद होत आहे . शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा दृष्टीने ब्लॉग निर्मिती करणे हा एक छोटासा प्रयत्न आहे.
        जुन्नर तालुक्यातील सर्व शाळांतील शिक्षक व विद्यार्थी आपल्या ज्ञानाचे,  कल्पनाचे,  विचारांचे,  उपक्रमांचे आदानप्रदान करतील, या हेतूने वेबसाईटची निर्मिती केली आहे. आजचे युग हे  स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक  क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे. यात आपल्या शाळाही मागे राहिलेल्या नाहीत. त्यासाठी अनेक शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. आपल्या  शाळेत राबविल्या जाणा-या उपक्रमांना प्रसिध्दी देण्यासाठी  तसेच आपले उपक्रम सर्व शिक्षक बांधवांपर्यंत पोहचवून त्यांनाही नवीन काही करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून या वेबसाईटची निर्मिती करण्यात आलेली आहे.
    शालोद्यानातून उमलणाऱ्यासुंदर कोमल फुलावर सुसंस्कार व्हावे .या बाल मनाचा सर्वांगीण म्हणजे भावनिक, बौद्धिक, शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास  व्हावा . हा विकास घडवण्याचे कार्य ज्ञानमंदिरच यशस्वीरित्या करू शकतात . ज्ञानार्जनाच्या या कार्यात मार्ग दाखवणारे शिक्षक हेच खरे दीपस्तंभ असतात. बंधुहो आपली ही मार्गदर्शकाची भूमिका यशस्वीरित्या पार पडण्यासाठी   junnareducation.blogspot.in हा ब्लॉग आपणास वेळोवेळी उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे . 

                                 श्री. बाळासाहेब राक्षे 
                                   गटशिक्षणाधिकारी
                                                  पं.स.जुन्नर 

No comments:

Post a Comment